अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पोलीस महिलेवर बलात्कार

 

*वाकड,पुणे* -पोलीस महिलेसोबतचे अश्लील फोटो तिच्या पतीला आणि तिच्या सहकारी पोलिसांना सोशल मीडियावर पाठवून व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने पोलीस महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज असगर चौधरी (वय २१, रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पिंपरी पोलीस लाईन, खडकी बाजार पुणे, लव्ह बर्ड लॉज, रॉयल इन लॉज निगडी, श्रीकृष्ण कॉलनी थेरगाव येथे घडला.

दरम्यान, आरोपीने त्याच्या मोबाईल फोनमध्ये फिर्यादी पोलीस महिला आणि त्याचे अश्लील फोटो काढले. ते फोटो फिर्यादी यांच्या पतीला आणि फिर्यादी यांच्या सहकारी पोलिसांना पाठवून व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. त्यातून त्याने फिर्यादी यांच्यासोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यापूर्वी आरोपी तरुण सुरज याने फिर्यादी पोलीस महिलेच्या आणि तिच्या सहा सहकाऱ्यांच्या विरोधात अपहरण, मारहाण आणि खंडणीची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे.

वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.