स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन – सावरकर यांचा द्रष्टेपणा पुस्तकातून उलगडणार

मुंबई दि.१८ :- केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर,चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केला असून याचे प्रकाशन येत्या २० एप्रिल रोजी होणार आहे. वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ असे अनुवादित पुस्तकाचे नाव आहे. दादर- पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्राची सुरक्षा आणि विदेशनीती यासंदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे राष्ट्रनायक होते. देशाला असणारा फाळणीचा धोका सर्वात आधी ओळखून फाळणी टाळण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करणारे ते खरेखुरे राष्ट्रनायक होते. त्यांचे राष्ट्रीय विचार स्वातंत्र्यपूर्व काळात ऐकले असते, तर फाळणी टळली असती. त्यांच्या विदेशनीतीची सूत्रे आणि दूरदृष्टी लक्षात घेऊन धोरणे आखली असती, तर सीमा सुरक्षित राहिल्या असत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या द्रष्टेपणाच्या गुणावर सविस्तर प्रकाशझोत या पुस्तकात टाकण्यात आला आहे.

मेट्रो ६ कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण – १५ हेक्टर जागेचा ताबा ‘एमएमआरडीए’ मिळणार

भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.