महापालिकेतर्फे गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय
मुंबई दि.०८ :- बृहन्मुंबई महान्पालिका क्षेत्रातील गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ विविध अद्ययावत सोयी सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी केली जाणार आहे.
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद
प्रस्तावित शौचालयामध्ये पुरुषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि अपंगांसाठी १ शौचकूप असणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती होण्याच्या दृष्टीने या शौचालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार असून या सोलर पॅनलमधून २० किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. निर्माण होणारी ही वीज विद्युत पुरवठा कंपनीला देण्यात येणार आहे.
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा नागरिकांशी सुसंवाद
स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग स्टेशन आणि पेय पदार्थांसह ‘एटीएम’ची देखील सुविधा मिळणार आहे.