बारसू रिफायनरीविरोधात उपनगरीय रेल्वे रेल्वे स्थानकांवर फलक, भित्तीपत्रकांद्वारे निषेध

मुंबई दि.०६ :- बारसू रिफायनरीविरोधात मुंबईत कोकणवासीय मुंबईकरांकडून आंदोलन करण्यात आले. ‘रिफायनरी हटवा, कोकण वाचवा’ अशा आशयाचे फलक, भित्तीपत्रकांद्वारे उपनगरी लोकल, रेल्वे स्थानके आणि मेट्रो रेल्वेत निषेध करण्यात आला.

‘महारेल’तर्फे तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण पुणे-गोव्याच्या दिशेचा प्रवास अधिक वेगवान

बारसूच्या जमीनीवर रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरु आहेत त्याला स्थानिकांचा विरोध आहे. जमिनी वाचविण्यासाठी स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. बारसू सर्वेक्षणालाही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला पण पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण केले जात आहे.

ब्राह्मण महासंघातर्फे कोतकर शाळेला टेबल टेनिस टेबल, अन्य साहित्य प्रदान

या लढ्याला पाठबळ देण्यासाठी मुंबईच्या विविध स्थानकांवर आणि रेल्वे, मेट्रोत पोस्टरच्या माध्यमातून निषेध नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.