‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत दाखल तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा – मंगलप्रभात लोढा

मुंबई दि.२० :- ‘सरकार आपल्या दारी’ या राज्य उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात एकूण १ हजार ५०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने या तक्रारी पडताळून यावर तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मराठीचे गुण दखलपात्र नसल्याच्या शासन निर्णयाने मराठी विषय सक्तीचा उरणारच नाही निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

ग्रँट रोड येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या डी वॉर्ड मध्ये ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमारे २०० अर्जदार महिलांनी आपल्या समस्या बुधवारी लोढा यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी लोढा बोलत होते. ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे, निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ करून द्यावा अशा सूचनाही लोढा यांनी केल्या.

विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार

अतिरिक्त महापालिका आयुक्त आशिष शर्मा, वीर माता तथा सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ.अभिनव देशमुख, बृहन्मुंबई महापालिका उपायुक्त डॉ. संगीता हसणाळे,डी वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.