ग्रामीण युवकांमध्ये खेळांना चालना
नवी दिल्ली, दि.३१ – ‘खेळ’ हा राज्यांच्या सूचीतला विषय असून खेळांना प्रोत्साहन, ग्रामीण युवकांमध्ये खेळांना चालना ही प्रामुख्याने राज्य सरकारांची आणि राष्ट्रीय क्रीडा संघांची जबाबदारी आहे. या प्रयत्नांना पुरक सहाय्य केंद्र सरकार करते. क्रीडा क्षेत्रात ग्रामीण युवकांचा सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे.
हेही वाचा :- व्यवसाय सुलभता अंमलबजावणी
ग्रामीण भागात विविध स्पर्धांच्या आयोजनासाठी वित्तीय सहाय्य पुरवण्यात येते. जानेवारी ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत अशा 36 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. युवा आणि क्रीडा मंत्री कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.