कौशल्य विद्यापीठामुळे कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीस चालना- राज्यपाल कोश्यारी

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०२ :- कौशल्य विद्यापीठातील अभ्यासक्रमांमुळे कुशल रोजगार आणि स्वयंरोजगारनिर्मितीच्या चळवळीला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. तर येत्या सहा महिन्यांत राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्रे उभारण्यात येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.‌

हेही वाचा :- नद्यांच्या प्रदूषणाबरोबरच आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ इमारतीच्या बांधकामाचे लवकरच भूमिपूजन केले जाणार असून २०२४ पूर्वी नव्या इमारतीत विद्यापीठाचे कामकाज आणि अभ्यासक्रम सुरू होतील. हे अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकविण्यात येतील, असेही लोढा यांनी सांगितले.

हेही वाचा :- साहित्य अकादमीचे माजी प्रादेशिक सचिव प्रकाश भातंब्रेकर गौरव विशेषांकाचे प्रकाशन

या विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशिन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या भावी योजनांची माहिती यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.