हॉलिवूड ऍक्टर ड्वेन जॉनसन उर्फ द रॉक या अभिनेत्याकरता प्रियंकाने बुक केलं चॉपर
मुंबई दि.२८ – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने लग्नाकरता जोधपुरमधील उमेद भवनात हा सोहळा ठेवला आहे. आता हे लग्न 1 आणि 2 डिसेंबर होणार आहे. असं म्हटलं जातं की, प्रियंकाने लग्नाकरता कोणत्याही बॉलिवूड कलाकारांना आमंत्रण दिलेलं नाही पण हॉलिवूडमधील एका अभिनेत्याला खास आमंत्रण दिलं आहे. प्रियंका चोप्राने बॉलिवूडच्या एकाही कलाकाराला आमंत्रण न देता फक्त हॉलिवूडच्या अभिनेत्याला खास आमंत्रण दिलं आहे. हा अभिनेता आहे हॉलिवूड ऍक्टर ड्वेन जॉनसन उर्फ द रॉक प्रियंका आणि निकच्या लग्नाकरता जोधपुरला पोहोचणार आहे.
हेही वाचा :- इफ्फी 2018 च्या सांगता समारंभात ‘इफ्फी’ विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार
प्रियंका आणि रॉक हॉलिवूडमध्ये बेवॉचमध्ये एकत्र होते. तर रॉक जुमांजी सिनेमात निक जोनससोबत दिसला होता. आता अशी माहिती मिळते की, प्रियंकाने रॉक करता हेलिकॉप्टर बुक केलं असून ते सरळ उमेद भवनात उतरणार आहे. प्रियंका – निक लग्नात सहभागी होणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना चांदीच नाणं देणार आहेत. या नाण्याचं वेगळेपण म्हणजे एका बाजूला NP म्हणजे निक आणि प्रियंकाच्या नावाचं आद्याक्षर आणि दुसऱ्या बाजूला गणेश आणि लक्ष्मी देवीचा फोटो असणार आहे. हे नाणं मुंबईतील एका लोकप्रिय ज्वेलर्से डिझाइन केलं आहे.