“ऊर्जा आणि पर्यावरण: आव्हान आणि संधी” आंतरराष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली, दि.२० – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली येथे “ऊर्जा आणि पर्यावरण : आव्हान आणि संधी” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने या परिषदेचे आयोजन केले आहे. आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात ऊर्जा आणि पर्यावरण हे मुद्दे केवळ विकसनशील देशांसाठीच नव्हे तर विकसित देशांसाठी देखील चिंतेची बाब आहेत, असे राष्ट्रपती यावेळी म्हणले.

हेही वाचा :- माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची शहीद जवानांना ५१ हजार रुपयांची सहाय्य निधी मदत

जागतिक कल बघता भारतासह बहुतेक देशांमध्ये कोळसा हाच मुख्य ऊर्जा स्त्रोत राहील, तर नूतनीकरण उर्जा स्रोत वाढत राहतील असे ते म्हणाले. औद्योगिक क्रांतीद्वारे राष्ट्रीय अर्थव्यवस्था वाढविण्याबरोबरच देशातील सर्व नागरिकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी देश कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले. जीवाश्म इंधन आणि इतर व्यवहार्य पर्यायांशी संबंधित पर्यावरणविषयक समस्यांवर कृतीशील कल्पना सुचवाव्यात असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी परिषदेत सहभागी झालेल्यांना केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email