नाविन्यता आणि उद्योजकता उत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते गांधीनगर येथे उद्घाटन
नवी दिल्ली, दि.१७ – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज गुजरातमधे गांधीनगर येथे नाविन्यता आणि उद्योजकता उत्सवाचे उद्घाटन केले. आरोग्य, शिक्षण, अन्न सुरक्षा, उर्जा उपलब्धता, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा यासारख्या भारतासाठीच्या महत्वाच्या मुद्यासंदर्भात भारताच्या चिंता दूर करण्यासाठी नाविन्यतेच्या शक्तीचा उपयोग व्हायला हवा असे राष्ट्रपती म्हणाले. नाविन्यता, कल्पकतेला प्रोत्साहन देणारी संस्कृती रुजवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. यामुळे प्रत्येक युवा भारतीयाला आपले सामर्थ्य जाणण्याची संधी प्राप्त होईल, याची खातरजमा होणार आहे.
केवळ नाविन्यपूर्ण कल्पना पुरेशी नाही तर त्यासाठी ती परिपक्व होऊन विस्तार आणि ती कल्पना वास्तवात साकारण्यासाठी सहकार्य मिळणेही तितकेच आवश्यक ठरते असे ते म्हणाले. नाविन्यक्षम विचारांना उपक्रमात रुपांतर करण्यासाठी एक परिसंस्था उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली