29 व्या महालेखापाल परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, दि.१० – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत 29 व्या महालेखापाल परिषदेचे उद्घाटन केले. उत्तरदायित्व पारदर्शकता आणि सुशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करायला हवे याबाबत आत्म परिक्षण आणि चर्चा करण्याची ही महालेखापाल परिषद उत्तम संधी असल्याचे ते म्हणाले. डिजिटल युगातील लेखा परीक्षण आणि लेखा ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे.
कॅग आपल्या लेखा परिक्षणात माहिती विश्लेषणाचा अधिकाधिक वापर करत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. लेखा परीक्षण म्हणजे कार्य समाप्ती नव्हे तर सरकारला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी आहे, असे ते म्हणाले.
Please follow and like us: