पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांसाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून मेजवानीचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांसाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काल रात्री राष्ट्रपती भवनात मेजवानीचे आयोजन केले होते. या समारंभाला बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना, किर्गिस्तानचे राष्ट्रपती सोरोनबे जिनबेकोव्ह, म्यानमारचे राष्ट्रपती यु विन मिन्ट, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली, भुतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्सेरिंग, थायलंडच्या पंतप्रधानांचे विशेष दूत ग्रिस्डा बुनरॅच हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. भारताची स्वप्न केवळ भारतापुरती मर्यादित नाहीत, जेव्हा आम्ही आमच्या प्रगतीसाठी काम करतो, त्याचवेळी आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व शेजारी देशांचाही आम्ही विचार करत असतो. हिंद महासागरापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेल्या या मध्यआशियाई प्रदेशातल्या सर्व राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक बंध आहेत आणि आपल्या आर्थिक संधीही समान आहेत. या सर्व देशांच्या आशा, आकांक्षा सारख्याच आहेत. अनेक शतकांपासून मध्य आशियातील व्यापार व्यवस्थेचा केंद्र बिंदू भारत राहिला आहे. हा आमचा वारसाही आहेच आणि आमचे भविष्यही आहे. आपल्या सर्व देशांमधल्या जनतेसाठी तसेच एकूणच जागतिक समुदायासाठी या प्रदेशात शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी आपण एकत्र काम करणे गरजेचे आहे. एकमेकांच्या प्रगती आणि कल्याणामधेच सर्वांचे हित सामावलेले आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email