राष्ट्रीय मतदान दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींनी केले संबोधित

नवी दिल्ली, दि.२६ – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली येथे नवव्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला संबोधित केले. भारतीय लोकशाही संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे. आपली लोकशाही सर्वात मोठी आणि सर्वाधिक वैविध्यपूर्ण असलेली आहे. निवडणूक प्रक्रियेत सर्वच संबंधितांचे योगदान महत्त्वाचे आहेत. यात मतदान आणि निवडणूक आयोग सर्वाधिक महत्त्वाचे असून त्यांच्या भूमिका एकमेकांना पूरक आहेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

हेही वाचा :- प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘दांडी यात्रे’च्या संकल्पनेवर आधारित देखणा चित्ररथ

भारतीय लोकशाही आणि निवडणूक पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान असून अनेक देशांमधल्या निवडणूक संस्थांनी आपल्या निवडणूक व्यवस्थापन यंत्रणेचा अभ्यास केला आहे. अनेक देशांमध्ये अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आणि क्षमताबांधणीत भारतीय निवडणूक आयोगाने सहाय्य केले आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी कौतुक केले. लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका पवित्र अनुष्ठानासारख्या असतात. सर्व नागरिकांनी या अनुष्ठानाचा भाग व्हावे आणि वर्ष 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले. प्रत्येक मत इतर मतदारांना प्रोत्साहित करेल आणि आपली लोकशाही अधिक बलशाली करेल, असे राष्ट्रपती म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email