राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि.२० – संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज शौर्य पुरस्कार आणि सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आज झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी सैन्य दलातील दोन किर्ती चक्र आणि 15 शौर्य चक्र प्रदान केली. एकनिष्ठपणे कर्तव्य बजावताना दाखवलेले दुर्दम्य साहस आणि शौर्य यासाठी हे पुरस्कार देण्यात आले. दोन किर्ती चक्र आणि दोन शौर्य चक्र मरणोत्तर बहाल करण्यात आली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 13 परम विशिष्ट सेवा पदक, दोन उत्तम युद्ध सेवा पदक आणि 26 अति विशिष्ट सेवा पदकंही प्रदान करण्यात आली.
Please follow and like us: