कल्याण लोकसभा मतदार संघातील मतदारांचे सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य

डोंबिवली दि.३१ – शिवसेना जात-पात मानत नाही. कल्याण लोकसभा मतदार संघात नेहमी उच्च शिक्षित उमेदवाराला विजयी करण्यात आले आहे .सध्या या भागात जो जातीयवाचक ,दिशाभूल करणारा प्रचार होत आहे. त्याचा कसलाही परिणाम कल्याण लोकसभा मतदार संघात होणार नाही व युतीचे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा निर्धार डोंबिवलीत करण्यात आला. कल्याण लोकसभा मतदार संघात सध्या “कॉग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील असून ते आगरी समाजाचे असल्याने या निवडणुकीत ‘आगरी कार्ड ‘वापरून आगरी जात बंधूंना मतदान करावे असा प्रचार केला जात आहे.

याला उत्तर देण्यासाठी शिवसेना व सेनेतील आगरी समाजाच्या कार्यकर्त्याचा मेळावा संपन्न झाला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे ,शिवसेना भाजप युतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे , आमदार सुभाष भोईर कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील ,नगरसेवक रमेश म्हात्रे ,दीपेश म्हात्रे ,सुखदेव पाटील ,बंडू पाटील ,मुकेश पाटील महिला आघाडी संघटक कविता गावंड यांच्यासह मोठ्या संख्येने शाखाप्रमुख ,विभाग प्रमुख उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदार संघातून या पूर्वी रामभाऊ म्हाळगी ,राम कापसे ,प्रकाश परांजपे व आता डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमाणे उच्च शिक्षित खासदार विजयी झाले असून मतदार संघाचे प्रश्न मांडणारे विजयी झाले आहेत खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 5 वर्षातपहिल्यादा खासदार होऊनही अनेक प्रश्न मांडले व सोडवले आहेत याकडे सर्वांनी लक्ष वेधले या मुळेच स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या आगरी समाजही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला व येत्या निवडणुकीतही उभा रहाणार आहे असा निर्धार करण्यात आला .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email