प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर – १२ जूनपर्यंत नोंदणी, पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला जाहीर
मुंबई दि.२७ :- पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आजपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात झाली.
असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रयत्नशील
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mumoa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन नावाची नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्यांना ही नोंदणी प्रक्रिया येत्या १२ जूनपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत करता येणार आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी चळवळ सुरु करावी- राज्यपाल रमेश बैस
त्यांनतर ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १९ जून रोजी सकाळी अकरा वाजता, दुसरी गुणवत्ता यादी २८ जून रोजी संध्याकाळी सात वाजता आणि तिसरी गुणवत्ता यादी ६ जुलै या दिवशी सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे.