ठाण्यात धावत्या रिक्षात महिलेशी अश्‍लील वर्तन

ठाणे दि.१४ – ठाणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच असून पुन्हा एकदा धावत्या रिक्षात 30 वर्षीय महिलेशी अश्‍लील वर्तन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. टेंभीनाका परिसरात राहणारी पीडित महिला घोडबंदरवरील ओवळा नाका येथे एका खासगी स्टुडिओमध्ये हेअर ड्रेसर आहे. तर हेमंत सोनावणे हा तिच्याबरोबरच काम करतो. ही महिला नोकरीला लागल्यापासूनच सोनावणे याची तिच्यावर वाईट नजर होती.

हेही वाचा :- डोंबिवली ; दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात तरुणाचा मृत्यू

15 नोव्हेंबर रोजी कामावरून सुटल्यावर पायी जात असताना छेड काढून रिक्षात विनयभंग केला होता. त्या वेळी या कृत्याबद्दल माफी मागून पुन्हा असे घडणार नाही, असे सांगितले होते. तरीही तो तिचा पाठलाग करत होता. 6 डिसेंबर रोजी सकाळी कामावरून सुटल्यानंतर पुन्हा या प्रेमवीराने पाठीमागे येत माफी मागितली. त्यानंतर घरी जाण्यासाठी म्हणून ही महिला रिक्षात बसल्यानंतर तोही जबरदस्तीने त्याच रिक्षात बसला आणि मागच्या वेळेप्रमाणेच रिक्षा उड्डाणपुलावर येताच त्याने अश्‍लील वर्तन करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :- डोंबिवली – भरधाव दुचाकीच्या धडकेत १३ वर्षीय मुलगी जखमी

तेव्हा या महिलेने त्याला प्रतिकार केला. रिक्षातच जोरजोरात ओरडाआरडा करून तिने रिक्षा थांबवायला लावली. त्या वेळी सोनावणेने तिला धक्का मारल्याने ती खाली पडून जखमी झाली. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हेमंत सोनावणे याला या प्रकरणी अटक vआहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email