२४ तास उलटूनही मतदान पेट्या पोहचल्या नाहीत..

डोंबिवली दि.३० – कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणूक सोमवारी संपली. सर्व सील बंद मतपेट्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील तळघरात सुरक्षित ठेवण्यात आल्या.मात्र या मतदार संघातील कळवा – मुंब्रा विधानसभा मतदार संघातील ३२३ मतपेट्या २४ तासानंतरीही सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील पोहचल्या नाहीत. या संदर्भात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे माहिती देताना म्हणाले, मतदान संपल्यानंतर निवडणूक उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतपेट्या सीलबंद करताना तेथे उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र उमेदवारांच्या प्रतिनिधींना तीन वेळा वेगवेगळ्या वेळेला बोलावण्यात आले होते. परंतु प्रतिनिधींना आत सोडण्यात आले नाही.

मात्र २४ तासानंतरही आत काय सुरु आहे याची आम्हाला कल्पना नाही. कश्यामुळे या कामास विलंब होत आहे याचे कारणही सांगत नाही. कळवा – मुंब्रा हा अतिशय संवेदनशील असून या भागातीलच मतपेट्या अद्याप का पोहोचल्या नाहीत याबद्दल संशय व्यक्त होत आहे.३२३ मतपेट्या अदुयाप ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील येथीलस्टोगरूम मध्ये का पोहोचल्या नाहीत याची माहिती मिळावी म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे तक्रार केल्याचे लांडगे यांनी सांगितले.या संदर्भात निवडणूक निर्णय शिवाजी काबदाणे यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email