संचार बंदीच्या पार्श्वभुमीवर उरण मध्ये पोलिसांचे लॉंग मार्च

(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.०९ :- कोरोना रुग्णाची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र शासन तसेच पोलिस प्रशासना तर्फे वारंवार सूचना व जनजागृती करून सुद्धा नागरिक वीणा कारण घरा बाहेर पडत आहेत. काही ठिकाणी हॉस्पिटल मध्ये जायचे आहे, मेडिकल औषध घ्यायचे अशी खोटी कारणे सांगून नागरिक संचार बंदीतही कुटुंबा सहित घरा बाहेर फिरत आहेत तर काही ठिकाणी नागरिक वीणा कारण गर्दी करत आहेत त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसें दिवस वाढ होत आहे.
संचार बंदी व लॉक डाउनच्या पार्श्वभुमीवर आज उरण मध्ये पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस वाहनातून माईक द्वारे सूचना देण्यात आल्या तसेच लाँग मार्च चे आयोजन करण्यात आले.उरण मध्ये जेंव्हा पासून लॉक डाऊन तसेच संचार बंदी लागू झाली आहे तेंव्हा पासून पोलिस प्रशासन नागरिकांची काळजी घेत उरण मधील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण होवु नये यासाठी रात्रं दिवस मेहनत घेत आहेत. मात्र उरण मधील काही नागरिक या प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसून येत नाही.
त्यामुळे अश्या बेकायदेशीर व विनाकारण  फिरना-या व्यक्तिवर उरण पोलिस प्रशासना तर्फे कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.तर संध्याकाळी 5 नंतर मेडिकल तसेच दवाखाने सोडून अन्य वस्तु खरेदी करण्यास तसेच घराबाहेर निघण्यास नागरिकांना बंदी घातली आहे.नागरिकांनी टु व्हीलर, फोर व्हीलर घेवून रस्त्यावर येवु नये.कोणी तसे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.