Dombivali ; पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मारहाण

कल्याण दि.१४ :- डोंबिवली पश्चिमेकडे गुप्ते रोडला मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विष्णूनगर पोलिस ठाण्याचे फौजदार औदुंबर म्हस्के आपल्या पथकासह गस्त घालत होते. या ठिकाणी निलेश म्हात्रे, गोपाळ म्हात्रे व दिनेश यादव हे आपापसात भांडण करत असल्याचे निदर्शनास आले. फौजदार म्हस्के यांनी घटना स्थळीधाव घेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :- पैश्यांची मागणी केल्याने शौचालय चालकाला बदडले

मात्र संतापेल्या निलेश म्हात्रे, गोपाळ म्हात्रे व दिनेश यादव या तिघांनी शिवीगाळ करत फौजदार म्हस्के यांना धक्काबुक्कीसह मारहाण केली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी हल्लेखोर निलेश म्हात्रे, गोपाळ म्हात्रे व दिनेश यादव विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email