पंतप्रधानांनी अबु-धाबीच्या युवराजांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
नवी दिल्ली, दि.१६ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीचे युवराज शेख महंमद बिन झायेद अल नाहियान यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. द्विपक्षीय सर्वंकष धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या निर्धाराचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
हेही वाचा :- गुजरात विधानसभेच्या एका जागेसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
ओआयसी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत सन्माननीय अतिथी म्हणून संबोधित करण्यासाठी दिलेल्या निमंत्रणाबद्दल पंतप्रधानांनी, युवराजांचे आभार मानले. शांतता आणि प्रगती ही सामाईक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या ऐतिहासिक सहभागाचे योगदान राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
Please follow and like us: