पंतप्रधान २८ जून २०१८ ला संत कबीरनगरला भेट देणार
नवी दिल्ली, दि.२७ – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशातल्या संत कबीर नगर जिल्ह्यातल्या मगहर येथे भेट देणार आहेत.
थोर संत आणि कवी कबीर यांच्या ५०० व्या पुण्यतिथीनिमित्त संत कबीर यांच्या मझारवर ते चादरही चढवतील.
संत कबीर गुंफेलाही पंतप्रधान भेट देतील तसेच संत कबीर अकादमीच्या पायाभरणी समारंभानिमित्त कोनशीलेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. संत कबीर यांची शिकवण आणि विचार या कोनशीलेवर नमूद करण्यात आले आहेत.
त्यानंतर ते मगहर इथे सभेत जनतेला संबोधित करतील. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.