पंतप्रधान तिसऱ्या आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन करणार
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने मुंबईत हॉटेल ट्रायडंट/ ओबेरॉय आणि एनसीपीए येथे 25 / 26 जून 2018 रोजी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या (AIIB) तिसऱ्या वार्षिक बैठकीचे आयोजन केले आहे. या पूर्वी 2016 मध्ये बिजिंग आणि जेजू येथे, तर 2017 मध्ये कोरियामध्ये AIIBच्या वार्षिक बैठका झाल्या होत्या.
या वर्षीच्या बैठकीची संकल्पना ‘पायाभूत विकासासाठी अर्थ पुरवठा : संशोधन आणि सहकार्य’ अशी असून, विविध संघटनांचे नेते पायाभूत गुंतवणुकीच्या माध्यमातून शाश्वत भवितव्य निर्माण करण्यासाठी सूचना आणि अनुभव सादर करतील.
महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग हा नोडल विभाग असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ही नोडल संस्था आहे. भारतीय उद्योग महासंघ हा व्यावसायिक परिषद आयोजक (PCO)असून, विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली (RIS) ही या बैठकीसाठी ज्ञान भागिदार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत AIIBच्या सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ धोरण कर्ते, भागिदार संस्था, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाज संघटनांमधील सहभागी याला उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चेत सहभागी होणार असून, पर्यावरण स्नेही पद्धतीने आशियाच्या पायाभूत विकासातील त्रुटींवर आपले विचार मांडतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जून 2018 रोजी या तिसऱ्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन करतील. केंद्रीय रेल्वे, कोळसा, वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री पियुष गोयल आणि अर्थ मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फेब्रुवारी ते जून 2018 याकाळात भारतातील विविध शहरांमधे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावर्षीही एशियन इन्फ्रास्ट्रक्चर फोरमचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने फिक्कीच्या सहकार्याने ‘इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इक्स्पो 2018’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. अधिक माहिती http://aiib-am2018.gov.in/exhibition.php* या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
AIIBच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीविषयी अधिक माहिती:
Hashtag: #AIIB2018
*Twitter:* @AIIB_Official @FinMinIndia @PIBMumbai & @PIB_India
या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.