महाराष्ट्रातल्या “मिशन शौर्य” पथकातल्या सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली, दि.३० – महाराष्ट्रातल्या 10 आदिवासी विद्यार्थ्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाचा उपक्रम असलेल्या “मिशन शौर्य” पथकातील या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांनी मे 2018 मध्ये एवरेस्ट शिखर यशस्वीरित्या सर केले आहे.
प्रशिक्षणादरम्यानचे तसेच मोहिमेतले अनुभव विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. यशाबद्दल पंतप्रधानांनी मुलांचे अभिनंदन केले तसेच समूहातील सर्वांचा सत्कार केला. नियमितपणे खेळण्याचा सराव करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी उपस्थित होते.
Please follow and like us: