जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

नवी दिल्ली, दि.२९ – माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. “जॉर्ज साहेब हे देशातील सर्वोत्तम राजकीय नेत्यांपैकी एक होते” असे पंतप्रधानानी म्हटले आहे. स्पष्टवक्ते आणि निर्भीड असलेले जॉर्ज फर्नाडिस एक दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले होते. गरीब आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणारा तो एक खंबीर आवाज होता. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे.

हेही वाचा :- सुरत येथे होणाऱ्या युवा परिषदेतही पंतप्रधान सहभागी होणार

जेव्हा आपण जॉर्ज फर्नांडिस यांचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आयुष्यभर न्यायासाठी लढा देणारे एक धगधगते कामगार नेतृत्व उभे राहते,एक असे नेतृत्व, ज्याच्या प्रभावी वाणीसमोर मोठमोठे राजकीय नेते नामोहरम होत असत. दूरदृष्टी असलेले एक रेल्वेमंत्री आणि देशाला सुरक्षित आणि भक्कम ठेवणारे महान संरक्षण मंत्री …अशी त्यांची तेजस्वी कारकीर्द होती. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात, जॉर्ज फर्नांडिस यांनी कधीही आपल्या राजकीय विचारधारेशी तडजोड केली नाही. त्यांनी प्राणपणाने आणीबाणीचा विरोध केला. त्यांची साधी राहणी आणि विनम्रता वाखाणण्यासारखी होती. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत मी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लाखो अनुयायांच्या दुःखात सहभागी होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच प्रार्थना!!”

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email