कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेत्या विनेश फोगटचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
नवी दिल्ली, दि.२२ – इंडोनेशियातल्या जकार्ता-पालेमबंग येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्ती स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या विनेश फोगटचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
विनेश फोगटच्या विजयाने भारतात आनंदोत्सव होत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये ५० किलो गटात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल विनेशचे अभिनंदन. विनेशच्या यशामुळे येणाऱ्या ॲथलेटस्ना निश्चितच स्फुर्ती मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.