पंतप्रधान आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली, दि.०७ – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 2019 या वर्षासाठी दूरध्वनीवरुन परस्परांना शुभेच्छा दिल्या. रशियात आज साजऱ्या होत असलेल्या नाताळनिमित्त, पंतप्रधानांनी पुतीन यांना आणि रशियाच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षात उभय देशात विशेष धोरणात्मक भागीदारीअंतर्गत साध्य केलेल्या कामगिरीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली.

हेही वाचा :- निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामांच्या निविदा प्रक्रिया पार पाडून निधी खर्च करावा – पालकमंत्री एकनाथ शिंदे

मे मध्ये सोची येथे तर पुतीन यांच्या ऑक्टोबरमधल्या वार्षिक शिखर परिषदेसाठी झालेल्या नवी दिल्ली दौऱ्यादरम्यान झालेल्या यशस्वी विस्तृत चर्चेचे स्मरण करत द्विपक्षीय संबंधींची गती कायम राखण्याला दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. 2019 मध्ये वार्षिक ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठीच्या निमंत्रणाचा पुनरुच्चार पुतीन यांनी केला. संरक्षण आणि दहशतवादाला आळा घालणे यासारख्या महत्वाच्या द्विपक्षीय सहकार्याबाबतही चर्चा झाली. जागतिक व्यवस्थेत भारत-रशिया सहकार्याची महत्वाची भूमिका असल्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिक्स आणि इतर संघटनांमध्ये उभय देश घनिष्ठ चर्चा सुरुच ठेवणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email