सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल – लोकल वाहतूक मुंबई सेंट्रलपर्यंतच सुरू
चर्चगेट स्थानकादरम्यान आज सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेवर अप दिशेकडे येणारी लोकल वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच सुरू होती. तासाभरानंतर लोकल वाहतूक चर्चगेटपर्यंत सुरू झाली.
गावदेवी मंदिराजवळ उभारलेली बेकायदा इमारत तोडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त द्या
लोकलगाड्या चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच चालविण्यात येत असल्याने ग्रॅन्ट रोड, चर्नी रोड, मरिन लाइन्स आणि चर्चगेटला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्या उदघाटन
मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती झाल्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकल वाहतूक चर्चगेटपर्यंत सुरू झाली. मात्र लोकल उशिराने धावत होत्या.