ऊर्जा फाउंडेशनतर्फे रविवारी प्लास्टिक संकलन मोहीम

(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.२७ :- उर्जा फाउंडेशतर्फे ४९ वा प्लास्टिक कचरा संकलन उपक्रम येत्या २७ नोव्हेंबर रोजी डोंबिवली आणि ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका विभागीय कार्यालय, मानपाडा रस्ता, प्रियदर्शनी चौक, डोंबिवली (पूर्व) आणि सेवा रस्ता, ईटरनीटी कॉम्प्लेक्स गेटच्या समोर, तीन हात नाका, ठाणे या ठिकाणी प्लास्टिक कचरा संकलन केले जाणार आहे.

प्लास्टिक देताना ते व्यवस्थित बांधूनच आणावे, सुटे प्लास्टिक स्वीकारले जाणार नाही, आणलेल्या पिशवीसकट प्लास्टिक ट्रक मध्ये जमा करण्यात येईल, प्रत्येक व्यक्तीने आपले प्लास्टिक स्वतः ट्रकमध्ये टाकायचे आहे. फक्त घरगुती वापराचे प्लास्टिक स्वीकारले जाणार आहे. क्लिनिक किंवा लॅब मधील प्लास्टिक स्वीकारले जाणार नाही, असे ऊर्जा फाउंडेशनच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सकाळी १० ते ११.३० या वेळेत प्लास्टिक कचरा संकलन केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.