कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी
कल्याण दि.०३ :- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात गणपती, देवीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी हा आदेश बुधवारी जाहीर केला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपीच्या मूर्ती वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई – पुणे एक्स्प्रेस द्रुतगती महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, एक जण ठार
त्यामुळे महापालिका हद्दीतील मूर्तिकारांनी शाडू, पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असेही डाॅ. दांगडे यांनी आदेशात म्हटले आहे. महापालिका हद्दीतील मूर्तिकार, उत्पादक, विक्रेते यांनी महापालिका प्रभाग कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे.
‘निसर्गकवी’ ना. धो. महानोर यांचे निधन
जे मूर्तिकार, विक्रेते, उत्पादक परवानगी घेणार नाहीत, त्यांना पालिका हद्दीत मूर्ती विक्रीला परवानगी देण्यात येणार नाही. मूर्तिकार, विक्रेते, उत्पादकांनी दुकान, कारखान्याच्या दर्शनी भागात परवानगी मिळालेल्या नोंदणीची प्रत लावली पाहिजे. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात यामूर्तींचे विसर्जन केले जावे. खाडी, नदी, ओढ्यामध्ये विसर्जन करुन नैसर्गिक स्त्रोत बंद करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.