लोढा यांच्या ‘सीबीआय’ चौकशीसाठी याचिका
मुंबई दि.१० :- मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या कथित २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. गृहनिर्माण आणि सल्लागार क्षेत्रात २० वर्षांचा अनुभव असलेल्या रिअल्टर्स नेटवर्क या कंपनीने ही याचिका केली आहे.
‘माझे स्थानक माझा अभिमान’ स्पर्धा
कंपनीने व्यवस्थापकीय संचालक नटराज कृष्णन् यांच्यामार्फत ही याचिका केली असून आपली कंपनी लोढा यांच्यासह अनेक विकासकांकडे नोंदणीकृत असल्याचा दावा केला आहे. २०१३ मध्ये, आपण या प्रकरणी सुरुवातीला दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.