व्यापार सुलभतेबाबत राज्यांची कामगिरी

नवी दिल्ली, दि.२७ – व्यापार सुधारणा कृती आराखडा 2016 मधील अंमलबजावणी गुणांनुसार 16 राज्यांनी 340 सुधारणांपैकी 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अंमलबजावणी केली आहे. व्यापार सुधारणा कृती आराखडा 2017-18 मध्ये 18 राज्यांनी 75 टक्क्यांहून अधिक सामायिक गुण (सुधारणा पुरावा गुण आणि फीडबॅक स्कोर) प्राप्त केले आहेत.

हेही वाचा :- चर्मोद्योगाचा विकास

क्रमवारीत आंध्र प्रदेश 98.30 टक्के गुणांसह पहिल्यास्थानी, तेलंगण 98.20 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी तर हरियाणा 98.06 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. एकूण 9 राज्यांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. 6 राज्ये 90-95 टक्के क्रमवारीत आहेत. 92.88 टक्क्यांसह महाराष्ट्र 13 व्या स्थानी आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email