डोंबिवलीत सर्रास कुठेही पार्किंग….

डोंबिवली दि.०३ – शहरात एका खासगी बँकेच्या सहाय्यने स्थानक परिसरासह ठिकठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात येत आहेत. परंतु ते बोर्ड लावल्यापासून टोर्इंग व्हॅनचे कंत्राट संपुष्टात आले आहे. त्यामुळे गाड्या उचलल्या जात नसल्याने कोणीही कुठेही दुचाकी, चारचाकी गाड्या पार्क करत आहेत. वाहतूक नियंत्रण विभाग आणि वॉर्डन यांना याबाबत विचारले असता, त्यांनी याबद्दल अनभिज्ञता दर्शवत वरिष्ठांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार कार्यालयाशी संपर्क साधला असता, टोईंग व्हॅनचे कंत्राट संपले असून ठाण्याहून त्याला लवकरच पुर्नमंजुरी मिळेल आणि त्यानंतर पुन्हा नियमबाह्य गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

हेही वाचा :- डोंबिवली ; पाणी चोर धाबे मालकासह कर्मचार्या विरोधात गुन्हा दाखल

सध्या कारवाई होत नसल्याने स्थानक परिसरातील पूर्वेकडील दिशेला रामनगर, पाटकर रोड, स्टेशन परिसर, शिवमंदिर रोड, टाटा लेन, फतेह अली रोड, फडके रोड आदी भागात दुचाकीस्वार वाहने कशीही पार्क करत आहेत. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांसह व्यापारी वर्गाला होत आहे. वाहनांवर कारवाई तातडीने व्हावी, अशी मागणी जोर धरत असली तरी. शेकडो वाहनांवर कारवाई करतांना वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळ नसल्याचे सांगण्यात आले. तसेच संध्याकाळी, सकाळी गर्दीच्या वेळेत हमरस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करणे, कोंडी सोडवण्यावर भर द्यावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email