सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे पदनियुक्तया

उरण दि.१३ – सह्याद्रि प्रतिष्ठान ही गडकिल्ले संवर्धन, संरक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील नामवंत, प्रसिद्ध अशी राज्यस्तरीय संघटना असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्यांचे प्रचार व प्रसार करण्याचे कामही संघटना अनेक वर्षा पासून करत आहे. महाराष्ट्रातील गडकिल्लयांच्या संस्कृतीचे, ऐतिहासिक वारसांचे जतन व्हावे, गड किल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन व्हावे या दृष्टिकोणातुन सह्याद्रि प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने उरण तालुक्यात पद नियुक्तया करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा :- जायंट किलर सरपंच निशांत घरत यांचा भाजपला रामराम ?

उरण तालुका संघटक म्हणून हितेश श्याम पाटिल(भेंडखळ),अलंकार चंद्रकांत ठाकुर(चिरनेर) तर प्रितेश काशीनाथ कोळी यांची उरण तालुका संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. हितेश पाटिल, अलंकार ठाकुर, प्रितेश कोळी हे अनेक वर्षापासून सह्याद्रि प्रतिष्ठानच्या शिवकार्यात कार्यरत आहेत. सह्याद्रि प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमात नेहमी त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेत ह्या नियुक्तया करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिवप्रेमी, सह्याद्रि प्रतिष्ठानचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत, अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email