१ डिसेंबरला डोंबिवलीत तिरुपती बालाजी दर्शन सोहळ्याचे आयोजन
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२१ – अनेक भाविकांना विविध कारणांमुळे तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येत नाही हे लक्षात घेऊन येत्या १ डिसेंबर रोजी सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात बालाजी दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून सुमारे अडीच लाख भाविक लाभ घेणार आहेत. तिरूमला तिरुपती देवस्थान व ओम साईधाम मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रीनिवास मंगल उत्सव आयोजित करण्यात आला असून खा. डॉ. श्रीकांत शिदेव आ. सुभाष भोईर हे पण सहकार्य करीत आहेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे या दिवशी सायंकाळी ८ वाजता सहभागी होणार आहेत अशी माहिती आ भोईर यांनी दिली.
हेही वाचा :- maggi ; ‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या
आ. भोईर पत्रकार परिषदेत म्हणाले ,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न असून सुमारे २ लाख भाविक याचा लाभ घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निमित्त महाप्रसाद म्हणून १४ प्रकारची पक्वांने तयार करण्यात येणार आहे तिरुपतीला जे प्रसाद म्हणून लाडू देतात तोच लाडू भक्तांना मोफत देण्यात येणार आहे सायंकाळी १ हजार नवं विवाहित जोडपी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत या निमित्त शहरात दिव्याची रोषणाई करण्यात येणार आहे व दुपारी ३ ते ६ पर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेला खा डॉ श्रीकांत शिंदे व कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित होते डोंबिवलीतील विविध धार्मिक संस्था यात सामील असून सर्वाचे सहकार्य मिळणार असून राजकीय कार्यक्रमन्सून धार्मिक असल्याचे त्यांनी सांगितले