सामाजिक

तृणधान्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. १३
पौष्टिक तृणधान्यांबाबत राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.‌

या उपक्रमांतर्गत १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तृणधान्य पिके, त्यांची पौष्टिकता, आहारातील समावेशाचे फायदे याबाबत माहिती दिली जाणार आहे.

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीमध्येही जनजागृती केली जाणार आहे.
१ ते १५ सप्टेंबर या पंधरवड्यात शाळा आणि तालुकास्तरावर पालक, नागरिक आणि योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

तर १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ‘तृणधान्य आणि त्यांचे दैनंदिन आहारातील महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *