‘सीटबेल्ट अलार्म’ बंद करणा-या उपकरणाची विक्री, जाहिरात बंद करण्याचा आदेश
ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात केंद्र सरकारची कारवाई
मुंबई दि.१३ :- मोटारीच्या चालकाने व शेजारील सहप्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास मोटारीत वाजणारा अलार्म बंद करण्यासाठी वापरण्याच्या उपकरणाची जाहिरात आणि विक्री केल्याबद्दल केंद्र सरकारने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, स्नॅपडील व शॉपक्यूज या पाच बड्या ई-कॉमर्स कंपन्यांना त्या उपकरणांची विक्री आणि जाहिराती बंद करण्यास सांगितले आहे.
जी २० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारपासून मुंबईत
केंद्राच्या आदेशानंतर अशा एकूण १३,११८ जाहिराती मागे घेण्यात आल्या, त्यातील सुमारे आठहजार ॲमेझॉनच्या तर फ्लिपकार्टच्या चार ते पाच हजार जाहिराती विविध ठिकाणी होत्या. हल्ली मोटारीत बसल्यावर चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे कायद्यानुसार सक्तीचे आहे. अनेक आधुनिक नव्या मोटारीत प्रवाशांनी सीट बेल्ट लावले नाहीत तर अलार्म वाजत राहतो.
‘महारेरा’चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४५७ दलालांची २० मे रोजी परीक्षा
प्रवाशांनी सीट बेल्ट न लावता देखील हा अलार्म वाजू नये किंवा तो बंद व्हावा यासाठी काही विशिष्ट उपकरणे तयार करण्यात आली आहेत. या उपकरणांची जाहिरात आणि विक्री या ई-कॉमर्स कंपन्यांनी केली होती. सीट बेल्ट न वापरल्याचा अलार्म बंद करणारी ही उपकरणे प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी असून त्यांची विक्री व जाहिरात ही अनुचित व्यापार प्रथा या सदरात मोडते असा ठपका केंद्र सरकारने ठेवला होता. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग झाल्याबद्दल ही कारवाई केली आहे.