Dombivali ; हिरव्या पावसानंतर ऑरेंज पाऊस? तेलमिश्रीत पावसाने नागरिक हैराण

डोंबिवली दि.१० :- एमआयडीसी परिसरात तेलमिश्रित पाऊस पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर पावसाच्या पाण्यावर तेलाचे तवंग आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एमआयडीसीपरिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर आज डोंबिवली ऑरेंज पाऊस पडला आहे. मागच्या वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता.

हेही वाचा :- Dombivali ; क्रेडिटकार्डद्वारे बँकेची केली लाखोंची फसवणूक

नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत. त्यातच आज सकाळी डोंबिवली एमआयडीसी भागात पाऊस पडत असताना या पाण्यावर तेलाचा तवंग असल्याचं काही कंपनी मालकांना आढळून आलं. हा प्रकार प्रदूषणामुळेच घडल्याचा स्थानिकांचा दावा असून आसपासच्या कंपन्यांमधून सोडला जाणारा एखादा वायू पाण्याच्या संपर्कात आल्याने पावसाच्या पाण्यावर हा तवंग आल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता याप्रकरणी लवकरात लवकर तपास करून प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री मोदी की मुंबई को ३ नए मेट्रो रुटो की सौगात 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email