महापालिका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी ऑनलाईन आरक्षण
मुंबई दि.०४ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी आता लवकरच ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. महापालिकेने वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती.
शिवडी-न्हावाशेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पातील मार्गावर ८ पथकर नाके
तसेच वाहनतळाच्या व्यवस्थापनासाठी मोबाइल अॅप आणण्याचेही ठरवले होते. त्याला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधीच वाहनासाठी जागा आरक्षित करता येणार आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता – शरद पवार
येत्या काळात महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगतचे वाहनतळ आणि खासगी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा ही सर्व माहिती एकाच सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध होणार आहे.