बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे लवकरच ऑनलाईन पार्किंग सुविधा

महापालिका वाहनतळांवर वाहने उभी करता येणार

मुंबई दि.‌२५ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे लवकरच‌ भ्रमणध्वनीवरील ॲप आधारित ऑनलाईन पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.‌ महापालिका वाहन तळांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ग्रँट रोड, लोअर परळ, भांडुप,अंधेरी या वाहनतळांची यासाठी निवड करण्यात आली असल्याचे समजते.

‘फाईंड माय पार्किंग’ या ॲपचा वापर करून मुंबईकरांना आपल्या भ्रमणध्वनीवरून वाहनाच्या पार्किंगसाठी जागा शोधता येणार आहे. महापालिकेच्या पार्किंग प्राधिकरणाने यासाठी पुढाकार घेतला आहे. पार्किंग प्राधिकरणाने पार्किंग धोरण तयार केले असून ते महापालिका आयुक्तांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर अंतिम मंजुरीसाठी हे धोरण राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.