कशेडी घाटातील मुंबई गोवा महामार्गावरील बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू होणार- बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई दि.१० :- कशेडी घाटातील मुंबई गोवा महामार्गावरील बोगद्यातून एकेरी वाहतूक येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. राज्यातील ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग यांच्या कामांचा आढावा चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या निकाल – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्रात तीन लाख किलोमीटर राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि ग्रामीण पातळीवर रस्त्यांची कामे जलदगतीने सुरू आहेत. यात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणी डब्यातील फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई; ८६ लाखांचा दंड वसूल

संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून येणा-या अडचणींचे निराकरण करण्यात आले, असेही चव्हाण यांनी सांगितले. मुंबई गोवा महामार्गात येणाऱ्या अडचणीचाही आढावा घेण्यात आला. हा रस्ता तीन टप्यात पूर्ण केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी यातील अनेक रस्त्यांची एकेरी मार्गिका पूर्ण होईल. परशुराम घाटात माती कोसळल्यामुळे ही माती काढण्याचे काही पूर्ण केले जाईल, असेही चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.