कळवा मुंब्रा दरम्यान लोकल मधून पडून 1 जणांचा मृत्यू तर 2 जखमी
दिनांक ०५/०२/२०२० रोजी सकाळी ०९:०० वाजताच्या सुमारास कळवा मुंब्राच्या दरम्यान (कर्जत ते छ. शि. म. ट.) या लोकल ट्रेनने प्रवास करत असताना ट्रेनमधून ३ व्यक्ती पडून जखमी झाल्या आहेत त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे. येथे दाखल केले आहे.
सदर घटनेतील हाजीर रहिज अहमद (पु./ ५३ वर्ष राहणार- उत्तर प्रदेश, बरेली) या व्यक्तीचा उपचारादरम्यानर मृत्यू झाला आहे.
जखमी व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:-
१) इम्तियाज गुलाम हैदर शेख (पु./ ४३ वर्ष / राहणार- अमृत नगर, कौसा, मुंब्रा) या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे.
२) अब्बू ओसाम (पु./ ३० वर्ष / राहणार:- अमृत नगर, कौसा, मुंब्रा) या व्यक्तीच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.