डोंबिवलीमध्ये “वनराई” ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन

डोंबिवली दि.०६ :- येथे दि.७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्रौ १० पर्यंत प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनात आपणांस विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे, आयुर्वेदिक झाडे, हँगिंग, बगिच्यातीलझाडे व इतर प्रकारची झाडे व माहिती आपणांस या प्रदर्शनात पहावयास व विक्री होणार आहे, ह्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.

हेही वाचा :- या क्रमांकाच्या गाड्या होणार मुलुंडनाक्यावर टोल फ्री..

प्रदर्शनात नर्सरी बरोबर गृहाउपयोगी वस्तू खरेदी करू शकता!

खास आकर्षण सगळ्यात बुटकी गाय आपणांस पाहावयास मिळणार आहे, त्याचबरोबर कुंभार आपणांस मातीची भांडी तयार करून दाखवणार आहेत, त्यांच्याबरोबर आपण सेल्फीपन काढू शकाल, बैलगाडी सफर लहान मुलांसाठी व इतर अनेक गोष्टी आपणांस पहावयास मिळणार आहेत. पुणे येथील शेवगा व पेरू महासंघाचे अध्यक्ष आपणांस शेवगा व पेरू यांची लागवड कशी करावी याचे मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा :- क्षयरोग चाचणीचे सीबीनॅट अत्याधुनिक मशीन कार्यान्वित दोन तासात होणार क्षयरोगाचे निदान

प्रदर्शनात डोंबिवलीमधील विशेष उल्लेखनीय काम केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तीचे सत्कार करण्यात येणार आहेत. प्रदर्शनात डोंबिवली परिसरातील संस्थाचे अतिशय दिमाखदार नृत्य कार्यक्रम रोज सादर होणार आहेत. दिनांक ७ नोव्हेंबर रोजी गणपती मंदिर येथून प्रदर्शन स्थळा पर्यंत (के.डी.एम.सी ग्राउंड) दुपारी ४ ते ६ वा. वृक्ष दिंडी निघणार आहे, ह्या वृक्ष दिंडीमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे ही विंनती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email