पोलिसांसाठी ‘एक देश, एक गणवेश’! – सर्व राज्य सरकारांना पंतप्रधानांचा सल्ला
वृत्तसंस्था
सूरजकुंड (हरियाणा) दि.२९ :- देशभरातील पोलिसांचा एकाच प्रकारचा गणवेश असावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘चिंतन शिबिरा’त पंतप्रधानांन बोलत होते.
देशभरातील पोलिसांचा एकाच प्रकारचा गणेवश असेल, तर त्याची मागणीही वाढेल आणि अधिक चांगल्या दर्जाचे गणवेश तयार होऊ शकतील. देशभरात कुठेही पोलिसांना गणवेशावरून ओळखता येऊ शकेल. राज्ये त्यावर आपापल्या दलांची चिन्हे लावू शकतील, असे मोदी म्हणाले.
हा केवळ चिंतनासाठी ठेवलेला प्रस्ताव असून राज्यांवर त्याची सक्ती नसल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. तरुणांची मने अतिरेकी आणि विघातक गोष्टींकडे वळविणाऱ्या शक्तींचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हायला हवे, असे आवाहनही पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना केले.