दिवाळी सुट्टीनिमित्त, एसटीच्या विशेष गाड्या

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दिवाळी सुट्टीनिमित्त राज्यभरात १ हजार ४९४ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.‌ येत्या २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान या गाड्या धावणार आहेत.

प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

दिवाळी सुट्टीनिमित्त, एसटीच्या विशेष गाड्या

एसटी महामंडळाच्या ‘अमृत ज्येष्ठ
नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येत आहे. ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘मराठी रंगछटा’! – शेखर जोशी

दिवाळीत महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावाला जाण्याचे, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन करत असतात. नोकरीनिमित्त बाहेर असणारे लोकही आपल्या घरी जात येत असतात. त्यामुळे सर्वांनाच याचा लाभ घेता येणार आहे.

दिवाळी सुट्टीनिमित्त एसटी महामंडळाने विभागवार उपलब्ध करून दिलेल्या गाड्यांची संख्या अशी-

मुंबई (२२८) पुणे (३५८), औरंगाबाद (३६८), नागपूर (१९५) नाशिक (२७४), अमरावती (७१)

शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.