सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिवाळीनिमित्त राज्यात सहा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम

२५ आणि २६ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२१ :- राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिवाळीनिमित्त राज्यात विविध सहा ठिकाणी सांस्कृतिक- सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.‌ सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून होणा-या या सर्व कार्यक्रमांसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.‌ मुंबईत २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता ‘दीपावली संध्या’ आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा :- नेरळ- माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू

शौनक अभिषेकी, कार्तिकी गायकवाड, प्रसेनजीत कोसंबी आणि अन्य कलाकार सहभागी होणार आहेत. तर २६ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे.‌ या कार्यक्रमात अजित कडकडे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे सहभागी होणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम) येथे होणार आहेत. मुंबईसह नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथेही कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रसिाद द्यावा असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.