डोंबिवलीतील उजाला गायन स्पर्धेत ओमकार इंटरनॅशनल स्कूलची बाजी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०९ – डोंबिवली पूर्वेकडील आनंद दिघे सभागृहात उजाला गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १४ , १७ २१ व ४० वयोगटातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. स्पर्धेत डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल, गार्डीयन स्कूल, राँयल इंटरनॅशनल, माँडेल शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील ग्रुप गायनात ओमकार इंटरनॅशनल स्कूलने बाजी मारली मारली. तर सोलो गायनात ४० वयोगटाखालील स्पर्धकांमध्ये सई दास्ताने आणि ४० वयोगटावरील स्पर्धकांमध्ये प्रकाश येवाडे यांनी पहिला क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सी एम चषक, प्रमाण पत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
हेही वाचा :- दोन महिन्यापासून बंद असलेले डोंबिवलीतील सावित्रिबाई फुले नाटयगृह तातडीने सुरु करा
सोलो गायनात १४ वर्षाखालील गटात पहिला क्रमांक श्रेयस व्यास, दुसरा क्रमांक मोक्ष वारंगे आणि तिसरा क्रमांक मिताली भानुशाली, सोलो गायनातील १७ वर्षाखालील गटात पार्थ भारावले, देवश्री आणि वैशाली देवरे, ग्रुप गायनातील १४ वर्षाखालील गटात पहिला क्रमांक ओमकार इंटरनॅशनल स्कूल, दुसरा क्रमांक ओमकार इंटरनॅशनल स्कूल आयसीएसइ, तिसरा क्रमांक गार्डीयन स्कूल, उत्तेजनार्थ ओमकार सीबीएसइ आणि सुरंगा विश्वास, ग्रुप स्पर्धेतील १७ वर्षाखालील गटात पहिला क्रमांक ओमकार इंटरनॅशनल स्कूल एसएससी आणि दुसरा क्रमांक ओमकार आयसीएसइ आणि उत्तेजनार्थ म्हणून ओमकार ओमकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसइ यांना पारितोषिक देण्यात आले. सदर स्पर्धेच्या वेळी आयोजक भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, संयोजक भाजप डोंबिवली शहर उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे, ज्योती अय्यर, सहसंयोजक अश्विनी मुजुमदार, भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा अध्यक्षा महिला उज्वला दुसाने, ग्रामीण महिला अध्यक्षा रसिका पाटील, सचिन म्हात्रे, मंदार जोशी, रवी नायर, विक्रांत ज़ोशी, राजश्री पांजणकर, अॅड.माधुरी जोशी, विलास खंडीजोड, महिला आघाडी सचिव अक्षदा भोसले, सुरेश इलाकिल, श्रद्धा जोशी, निलेश सारंग, गोरखनाथ महाले, वर्षा परमार, आदि मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :- देशातल्या प्रमुख ९१ धरणातल्या पाणी साठ्यात २ टक्क्यांनी घट
या स्पर्धेत परिक्षक म्हणून विजया नायडू, भावना तुंबळे, अल्पा गाधेर, मंगेश लटके यांनी काम पहिले. वादक म्हणून प्रभुदेसाईआणि आठल्ये होते. या स्पर्धेत पहिल्या सत्रात ३७ सोलो आणि ७ ग्रुप तर दुसऱ्या सत्रात ४० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रणव भांबरे यांनी सांभाळली. तसेच २० प्रभागातील रांगोळी स्पर्धेत ६७६ स्पर्धकांनीहि यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मुलांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी कल्याण ग्रामीण भागात विविध स्पर्धेत आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी गायक स्पर्धकांच्या गाण्यांवर भाजप पदाधिकाऱ्यांनी नृत्य केले. डोंबिवलीतील प्रा. धनजंय वानखेडे यांना`इंग्रजी शिक्षणाचा विदर्भातील स्वांतत्र्य चळवळीवरील झालेल्या परिणामाचे ऐतिहासिक अध्ययन ( १८८५-१९४७ ) विषयावर पी.एच.डी मिळाल्याबद्दल नगरसेवक मोरेश्वर भोईर आणि पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला.