सांताक्रूझ येथे वृद्धाची हत्या

मुंबई दि.०८ :- सांताक्रूझ येथे वृद्ध नागरिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुरलीधर पुरुषोत्तम नाईक (८५) असे मृत वृद्धाचे नाव असून नाईक यांची देखभाल करण्यासाठी घरी काम करणा-या व्यक्तिने हत्या केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुंबई शहर आणि उपनगरात पाच नवीन अग्निशमन केंद्रे

नाईक यांचे हात, पाय बांधून आणि तोंडात रुमाल टाकून गळा आवळून हत्या करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे. नाईक पत्नी उमासोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहातात. हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत.

पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी – ‘सामना’ अग्रलेखातील ‘रोखठोक’

मुरलीधर यांना दोन मुले आणि एक मुली असून ते मुंबईच्या विलेपार्ले, चेंबूर आणि नवी मुंबई भागामध्ये राहतात. नाईक पती पत्नी एकटे राहत असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी पुरुष आणि महिला नोकर काम करायचे.

कोपर रेल्वे स्थानकातील नवा पादचारी पूल सुरू

स्वयंपाक आणि साफसफाई करून महिला नोकर निघून जायची तर पुरुष नोकर घरीच राहात होता.दरम्यान कृष्णा मनबहादूर पेरियार (३०) असे नोकराचे नाव असून आठ दिवसांपूर्वीच त्याला कामावर ठेवण्यात आले होते. कृष्णा फरार झाला असून सांताक्रुझ पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.