ऊर्जामंत्री यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

 

महावितरण कंपनी च्या पुणे विभागातील पुणे,सोलापूर,बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, येथील नियमित रिक्त पदांवर काम करत असलेल्या सुमारे 4000 कंत्राटी कामगारांच्या बदल्या कराव्यात असे पत्र महावितरण पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक मा.अंकुश नाळे यांनी काढले होते. त्या मुळे अनेक कंत्राटी कामगारांच्या बदली ऑर्डर निघाल्या.

या बदल्या अन्याय कारक असून कामगारांवर नाहक व खोटे आरोप लावून व आकसाने या बदल्या केल्या असल्याने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) या बदल्यांना जोरदारपणे विरोध केला.

माननीय खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या मध्यस्तीने
राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री मा.ना.प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांच्या कडे संघटनेने न्याय मागितला असता ना. राज्य ऊर्जामंत्री महोदयांनी मंत्रालयात गुरुवार दिनांक 9 जून 2022 रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा सोबत मिटिंग घेतली त्यात प्रशाकीय अधिकारी व प्रादेशिक संचालक देखील उपस्थित होते.

या मिटिंग मध्ये बरीच सकारात्मक चर्चा झाली व अंतिमतः या बदल्यानां स्थगित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

मात्र आज 15 दिवस झाले तरी मंत्री महोदयांच्या या आदेशाकडे दुर्लक्ष झाले. या बदल्या बाबतचे पत्र रद्द समजावे असे पत्र या अधिकाऱ्यांनी अजूनही काढले नाही. या बाबत संघटनेने मा अप्पर कामगार आयुक्त पुणे कार्यालयात मा.सहाय्यक कामगार आयुक्त मा.मुजावर साहेब पुणे यांच्या कडे सुनावणी ठेवली असता त्यांनी देखील मंत्री महोदयांच्या आदेशाचे पालन अधिकाऱ्याने करावे असे आदेश महावितरण ला काल गुरुवार दिनांक 23 जून रोजी दिले.

या वेळी सहाय्यक कामगार आयुक्त मा.मुजावर साहेब, महावितरणचे उप औद्योगिक संबंध अधिकारी पुणे मा.शिरीष काटकर, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आनेराव, संघटनमंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते.

 

Hits: 5

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email