आता लक्ष्य रामराज्याचे !

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीविषयी ऐतिहासिक निकाल देऊन ती भूमी ‘रामलला विराजमान’ला प्रदान केली. या निकालाने श्रीरामजन्मभूमीचा वनवास संपून रामजन्मभूमीला न्याय मिळाला. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कित्येक दशके रामभक्त हिंदू ज्यासाठी संघर्ष करत होते, ती भूमी अखेर मुक्त झाली. स्कंदपुराणामध्ये रामजन्मभूमी स्थळाचे माहात्म्य कथन करतांना रामजन्मस्थानाचे दर्शन मोक्षदायी असल्याचे म्हटले आहे; मात्र या भूमीचे दर्शन घेण्यासाठी आतापर्यंत अनेक निर्बंध पार करावे लागत होते. न्यायालयाच्या निर्णयाने ते दूर होतील. आता यथाशीघ्र भव्य राममंदिर उभारणीचे काम पूर्णत्वास जावे आणि ऊन-पाऊस झेलत तंबूत असलेली श्रीराममूर्ती विधीवत् आणि वैभवाने मंदिराच्या गाभार्‍यात प्रतिष्ठापित व्हावी.

हेही वाचा :- अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तत्काळ निर्णय घेत विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या धर्तीवरील सर्व सुविधा मिळाव्यात अभाविपची राज्यपालांकडे मागणी

या निकालाचे श्रेय मंदिरासाठी अखंड लढा चालू ठेवणारे पूर्वज, बलीदान करणारे साधू-संत, कारसेवक आणि न्यायालयात मंदिरांची बाजू मांडणारे अधिवक्ता, राममंदिर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करणारे आणि सदिच्छा देणारे सर्वसामान्य भाविक यांचेही आहे. वास्तविक प्रभू श्रीराम हे केवळ भारताचे आराध्यदैवत नाही, तर अन्य विदेशांसाठी पूजनीय आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड या मुसलमानबहुल देशांत श्रीरामाला आदराचे स्थान आहे. इंडोनेशियाच्या चलनावर श्रीरामाचे चित्र छापले जाते. त्या ठिकाणी शासनाच्या वतीने १ महिना श्रीरामलीलेचा कार्यक्रम साजरा केला जातो. बौद्ध धर्मीय असलेला थायलंडचा प्रत्येक राजा स्वतःला श्रीरामाचा वंशज समजतो आणि त्याच्या नावासमोर ‘रामा’ असे लावतो.

हेही वाचा :- राफेल प्रकरणात सीबीआय मार्फत गुन्हा दाखल करून चौकशी करावीः आ. पृथ्वीराज चव्हाण

हे एकीकडे असतांना दुसरीकडे प्रभू श्रीरामचंद्र ज्या मातीत जन्मले त्या भारतातच श्रीरामाला ‘काल्पनिक पात्र’ म्हणून संबोधले गेले. सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या नावाखाली रामसेतू तोडून टाकण्याचा प्रयत्न झाला. या सर्वांमागे कोणाचा ‘हात’ होता, हे वेगळे सांगायला नको. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एकमताने दिलेल्या निर्णयाचे विशेष महत्त्व आहे. या निर्णयामुळे हिंदुत्वनिष्ठांनी राममंदिराच्या उभारणीसाठी उभ्या केलेल्या भारतव्यापी विशाल आंदोलनाला सुवर्णविराम मिळाला.

रावणाचे वैचारिक वंशज !

या महत्त्वपूर्ण निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशात पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. कोणतेही गालबोट लागू नये; म्हणून सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत होती. निकाल देणार्‍या न्यायाधिशांची सुरक्षाही वाढवावी लागली. हा सगळा खटाटोप करण्याची वेळ येणेही दुर्दैवी आहे. वातावरण गढूळ करणारे समाजकंटक आजही मोठ्या प्रमाणात आहेत, हेच यातून ध्वनीत होते. निकालानंतर एम्आयएम् पक्षाच्या असदुद्दीन ओवैसी यांनी खेद व्यक्त करत ‘तथ्यांपेक्षा भावनांचा विजय झाला’, अशी प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया म्हणजे न्यायालयाचा एकप्रकारे अवमानच आहे. त्याच वेळी रावणाचे वैचारिक वंशज आजही शिल्लक असल्याची पुष्टी आहे.

हेही वाचा :- राफेल प्रकरणात सीबीआय मार्फत गुन्हा दाखल करून चौकशी करावीः आ. पृथ्वीराज चव्हाण

सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येमध्ये मोक्याच्या जागी ५ एकर भूमी देण्याचा न्यायालयाचा निर्णय प्रथमदर्शनी अनाकलनीय वाटला, तरी राममंदिराच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाल्याने हिंदूंना झालेला आनंद कैकपटीने महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने परकीय आक्रमकांच्या विळख्यातून रामजन्मभूमी मुक्त झाली, त्याप्रमाणे कृष्णजन्मभूमी आणि काशी विश्‍वनाथांचे स्थानही मुक्त व्हावे, अशी हिंदूमनाची अपेक्षा आहे.

हेही वाचा :- छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारात पडल्याची घटना

मंदिरांची निर्मिती केवळ वास्तू म्हणून नाही, तर जगाला हिंदु धर्माचा आध्यात्मिक वारसा शिकवणारे चैतन्यकेंद्र किंवा शक्तीकेंद्र म्हणून व्हावी. राममंदिरासह रामराज्यासारखी व्यवस्था प्रस्थापित होणेही महत्त्वाचे आहे. त्या दिशेने सर्वांनी प्रयत्न करणे, हीसुद्धा एकप्रकारची ईश्‍वराची आराधनाच आहे. राममंदिराच्या पूर्णत्वाने चालू होणारी ही प्रक्रिया रामराज्याच्या निर्मितीने सुफळ-संपूर्ण व्हावी, अशी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email